MY BABY MARATHI
माझं बाळ!
या सदरामध्ये आम्ही सर्वसामान्य बाळाची वाढ, त्याचे आमच्या दृषटिकोनातून होणारे फेरफार, काही ठळक बदल ज्याकडे विशेष लक्ष द्यावे, तसेच बाळाच्या विश्वात विविध थेरापिंच स्थान या विषयांवर महिती देणारं आहे.
थेरपी : (rehabilitation) बिना शस्त्रक्रिया बिना औषध केले जाणारे उपचार.
गेल्या काही वर्षात असं लक्षात आलं आहे की मुलांमध्ये वाढीच्या काळात अनेक असे प्रश्न दिसून येतात की जे कोणत्याच औषधांनी किंवा शस्त्रक्रियेने बरे होणार नसतात. असे प्रश्न विविध प्रकारे अभ्यासून त्यांना सोडवण्याचा एक प्रयत्न केला जात आहे ज्याला थेरेपी म्हणतात.
या थेरपी मुलांना लागणाऱ्या मदतीच्या आधारे विविध प्रकारात विभागल्या जातात.
• फिजिओथेरपी
• ओल्युपेशनल थेरपी
• स्पीच थेरपी
• बिहविरल थेरेपी
यातील प्रत्येक प्रकार वेगवेगळ्या प्रश्नानं मध्ये उपयोगी येतो. आज या विषयावर अधिक जाणून घेऊ.
फिजिओथेरपी: या प्रकारात मुलांच्या physical म्हणजेच भौतिक वाढीत येणारे प्रश्न सोडवले जातात. जसे की बाळ तीन महिन्याचा होऊन गेला तरी अजून डोकं नीट उचलत नाही. आठ महिन्यांचा बाळ माझं बसवलं तरी बसत नाही.माझा बाळाचा जन्मतःच एक पाय थोडा वाकडा आहे किंवा हाताला तीनच बोट आहेत. अथवा माझं बाळं चालताना सारखं सारखं पडत. हे किंवा यासारखे अनेक प्रश्न जे मुलाच्या वाढीत दिसून येतात ते सोडवण्यासाठी फिजिओथेरिस्ट मदत करू शकतात.
ओक्यूपेशनल थेरपी: आता इथे मुलांच्या संवेदना, त्यांचे जगाशी होणारे नाते, त्यांच्या वयानुसार बदलत जाणारी काम करण्याची क्षमता अशा अनेक विषयांवर काम केलं जातं. उदाहरणार्थ आमच्या मुलीला तिच्या वयाच्या मुलांमध्ये खेळायला अजिबात आवडत नाही. आमची मुलगी एकटी एकटी राहते एकच एक क्रिया परत परत करत राहते. आमच्या मुलाच्या हातात म्हणावा तसा जोर नाही. तो साध्या साध्या गोष्टींना खूप घाबरतो. आमचा मुलगा वांड आहे कोणाचं आईकत नाही. हे आणि या सारखे अनेक प्रश्न.
स्पिच थेरपी: याच नाव स्पीचं थेरपी असेल तरी इथे बोलण्याखेरिज तोंडाच्या हालचाली, गिळणे, या विषयांवर पण काम केलं जातं. हे थेरपिस्ट गच्च बंद तोंडावर उपाय करतात तर माझी मुलगी कुरकुरीत काही तोंडात घालत नाही यावर पण काम करतात. कधी बोलू न शकणाऱ्या मुलावर काम करतात तर कधी तिला बोलता येते पण काय म्हणायचं आहे ते नीट सांगता येत नाही या वर पण काम करतात.
बिहेविरल थेरपी : इथे लहान मुलांच्या विश्वात जाऊन त्यांचा मानसिक जडणघडणीचा अभ्यास करून त्यांच्या वागणुकीत कसा बदल घडवावा या वर काम केलं जातं.
म्हणजे आमच्या मुलाच्या जीवाला शांती नाही. तो एका जागी बसतच नाही. आमची मुलगी नीट बोलत नाही सारखी आडखलते, किंवा आमचा मुलगा शाळेत जायला नाहीच म्हणतो. अथवा शाळेत खूप मारामारी करते. ही आणि अशी अनेक न उलगडणारी कोडी सोडवून मुलांना मदत करतो.
या सर्व विभागानं मध्ये एकमेकात गुंफणआरा धागा असतो. जसं चौड्य वर चालणारी मुलगी हिचे कधी पिंढ्रीचे स्नायू कअडक असू शकतात तर कधी पायाच्या तलव्याला (hypersensitivity) कधी कानाच्या आतील तोल सांभाळणाऱ्या अवयवाच्या कामात बिघाड असू शकतो. आता इथे स्नायूंवर काम करणारी थेरपिस्ट पण लागते आणि संवेदनांच्या वर पण.
असाच प्रकार गप्प राहणाऱ्या मुलांबाबत असू शकतो. त्यांना स्पिचं थेरपी बरोबर बीहेविरल थेरपीचा पण आवश्यकता लागते.
काळाची ही गरज लक्षात घेऊन आता आमच्या सारख्या अनेक सेंटरमध्ये हे थेरपिस्ट एकत्र काम करू लागले आहेत. जेणेकरून पाल्याला एके जागी सर्व मदत मिळावी आणि सर्वांच्या ज्ञानाचा त्याला फायदा मिळवा.
आता पुढच्या लेखात बघू, ' माझ बाळ नीट वाढतंय ना? मला कसं समजणार???
डॉ. शि वांगी पुरंदरे
Comments